HON. SHARADRAO GOVINDRAO PAWAR
PRESIDENT
Our Commitment to Society
To serve the needs of society in general and downtrodden class in particular by imparting knowledge and development skills and attitude to inculcate in them the values of life to emerge as a useful citizen and fully developed individual.
Latest Update
बालमंदिर विभाग आषाढी एकादशी दिंडी
सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे कडून विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा!”
नुकतीच सुरू केलेली विनामूल्य इलेक्ट्रिक वाहन सेवा — मुख्य प्रवेशद्वारातून थेट कॉलेजपर्यंत सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी.
आज या नवीन गाडीची पूजा मा. प्रमिलाताई गायकवाड (सरचिटणीस) आणि मा. धैर्यशील वंडेकर (खजिनदार) यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सर्व शाखाप्रमुखांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू झाला.
ही सेवा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाला आणखी सुखकर आणि सुरक्षित करेल
राज्यसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या निकालानुसार श्री. निवास कचरे, माजी विद्यार्थी, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे याने अंतिम घोषित गुणवत्ता यादीमध्ये ६५ क्रमांक पटकविला आहे.
त्यांना परिषदेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा घोलप तसेच परिषदेचे व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांना मदत
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व सर्व संलग्न शाखा यांच्यावतीने सोलापूर आणि मराठवाडयातील पूरग्रस्त भागातील लोकांना किराणा साहित्य व कपडे यांचे वाटप करण्यात आले. ६०० हून अधिक कुटुंबांपर्यंत सदर मदत पोहोचविण्यात आली. संकलन करण्यात आले. .सदर मदत ही सोलापूर जिल्हा , माढा तालुक्यातील सीना दारफळ, केवड, निमगाव अशा विविध गावांमध्ये थेट गरजू लोकांपर्यंत देण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिलाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संस्थेतील सर्व शाखांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला व गरजुंपर्यंत मदत पोहोचविण्यात हातभार लावला.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे गरजूंसाठी कपडे संकलन
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व सर्व संलग्न शाखा यांच्यावतीने गरजूंसाठी कपड्यांचे संकलन करण्यात आले. २०० हून अधिक महिला, लहान मुले, पुरुष यांचे कपडे यावेळी जमा करण्यात आले.सदर मदत ही गुडविल इंडिया या सेवाभावी संस्थेमार्फत विविध ठिकाणी गरजू लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिलाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संस्थेतील सर्व शाखांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला व गरजुंपर्यंत मदत पोहोचविण्यात हातभार लावला.






























